dr.satish best web design developer for mac

तावरेवाडी हे गाव कोल्‍हापूर जिल्‍हामधील गडहिंग्‍लज तालुक्यामधील छोटे पण सुंदर व निसर्गाने नटलेले गाव आहे. आमच्या गावाच्या शेजारूण घटप्रभा नदी वाहते गावास विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे . जसे भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्‍कार प्राप्‍त झालेला आहे. आमच्या गावास तंटामुक्‍त पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे.गावामध्‍ये प्‍लॅस्‍टीक बंदीसाठी कापडी पिशवी सर्व कुटुंबाना वाटप केलेली आहे. तसेच गावामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे घनकचरा एकत्रित साठविला जातो. त्‍यामुळे गावामध्‍ये स्‍वच्‍छता राहण्‍यास मदत होते. गावामध्‍ये मृदा जलसंधारणाची कामे केलेली आहेत.गावाला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

तावरेवाडी ग्रामपंचायत ही सन 1989 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत.

सरपंच
सौ. भारती नारायण मनगुतकर

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. बजरंग लक्ष्मण पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. हनुमान बापुराव राऊत

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Tawrewadi Grampanchayat
Tawrewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9637126924

Office :